“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

पूर्व प्राथमिक शाळा, ओगलेवाडी


सौ. अनुजा भालचंद्र अराणके
मुख्याध्यापिका पूर्व प्राथमिक शाळा, ओगलेवाडी
व्हिजन
“बालमनावर संस्कार देई जीवनाला
आकार”
मिशन
“सुरक्षीत संस्कारक्षम व प्रेमळ वातावरणात बालकांचे शारीरिक , बौद्धिक व मानसिक संगोपन करणारी शाळा”
* शाळेची स्वतःची स्वतंत्र इमारत
* एलसीडी प्रोजेक्टर आणि संगणकाच्या माध्यमातून शिक्षण मनोरंजन
* ग्रंथालय
* मुलांवर संस्कार करण्यासाठी निवडक पुस्तकांचा खजिना
* गाणी, गोष्टींच्या सीडीज
* चित्रे, तक्ते, भारतीय बैठक व्ययस्थेने सुसज्ज वर्ग खोल्या
* अॅक्वा वॉटर प्युरीफायरचे शुद्ध पाणी
* विद्यार्थी– विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
* अग्निशमन यंत्रणा
* आकर्षक गणवेश
* पोषक खाऊ
* कुशल व्यवस्थापन
* आपत्कालीन प्रसंगासाठी फर्स्टएड बॉक्स
ओगलेवाडी परिसरातील बालकांना शिक्षणाची गोडी लागावी , डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची घराच्या सान्निध्यात शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने १९८२ साली शिक्षण मंडळ , कराडने पूर्व प्राथमिक शाळेची स्थापना केली. सदाशिव गडाच्या पायथ्याशी, निसर्गरम्य वातावरणात मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक शाळा व प्राथमिक शाळा आज ओगालेवाडीचे भूषण ठरल्या आहेत. शाळेची टुमदार इमारत, सभोवताली जाणीवपूर्वक तयार केलेली सुंदर बाग, प्रशस्त क्रीडांगण, घसरगुंड्या, झोपाळे, सी-सॉ अशी खेळाची साधने, पक्के बांधकाम केलेले कुंपण, कुंपणाच्या भोवताली सळसळते वृक्ष व सर्व परिसरावर सतत चौफेर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पूर्व प्राथमिक शाळेतील लहान गात आणि मोठा गट अशी विद्यार्थ्यांची विभागणी केलेली आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, कामगार, नोकरदार अशा वैविध्यपूर्ण कौटुंबिक वातावरणातील बालके शाळेत प्रवेश घेतात. सुरुवातीला ८० विद्यार्थी संख्येवर सुरु झालेल्या शाळेची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व शिक्षिका विशेष प्राविण्य संपादन केलेल्या, पदवीधर आणि शिशुगटाच्या शैक्षणिक गरजांची पूर्ण माहिती असलेल्या आहेत.‘कोवळ्या सोनेरी उन्हात बोबड्या मधुर बोलांनी’, ‘शुभंकरोती कल्याण्’ सारखे श्लोक पाठ करणारी किंवा ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ सारखी बालगीते उच्च स्वरात म्हणत असलेला बालचमू बघितला म्हणजे आपण नक्कीच ओगालेवाडीच्या पूर्व प्राथमिक शाळेत आहोत असे समजायचे. टुमदार इमारत, रंगीबेरंगी पानाफुलांनी सजलेल्या बोलक्या भिंती, मुबलक खेळाची साधने, प्रशस्त मैदान आणि मुलांना जीव लावून आत्मीयतेने शिकविणाऱ्या शिक्षिका व सेवकवर्ग म्हणजे शिक्षण मंडळाची पूर्व प्राथमिक शाळा असा लौकिक ओगलेवाडी परिसरात शाळेने प्राप्त केलेला आहे.
अ. नं. | वर्ग | मुले | मुली | एकूण |
१ | लहान गट | ११ | १३ | २४ |
२ | मोठा गट | १४ | १४ | २८ |
एकूण | ५२ |
शालेय शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम २०१९-२० | ||
अ.क्र. | महिना | उपक्रमाचा तपशील |
१ | जून | नवागतांचे स्वागत |
योगदिन | ||
२ | जुलै | पालक सभा,वारकरी दिंडी |
३
| ऑगस्ट | १ ऑगस्ट – लोकमान्य टिळक पुण्यतिथी व संस्था स्थापना दिन, भाषण स्पर्धा |
नाग पंचमी – मेहंदी काढणे | ||
क्षेत्र भेट – कुंभार वाडा | ||
श्रावणातील चार शुक्रवार मुलांना आरती शिकवणे | ||
श्रीकृष्ण जन्माष्टमी – दहीहंडी | ||
४ | सप्टेंबर | विद्यार्थी गणेशोत्सव, श्लोक पाठांतर स्पर्धा |
५ सप्टेंबर – शिक्षक दिन | ||
खाऊ तयार करणे (भेळ) | ||
५ | ऑक्टोबर | २ ऑक्टोबर – महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती, भाषण स्पर्धा |
५ ऑक्टोबर – भोंडला | ||
८ ऑक्टोबर – पाटीपूजन (दसरा) | ||
फॅन्सी ड्रेस स्पर्धा | ||
पालक सभा | ||
दिवाळी सणाविषयी इंत्यभूत माहिती सांगणे तसेच आकाश कंदिल बनविणे | ||
६ | नोव्हेंबर | १४ नोव्हेंबर – बाल दिन |
मुलांची सहल | ||
७ | डिसेंबर | क्रीडा स्पर्धा |
वार्षिक स्नेहसंमेलन | ||
८ | जानेवारी | सरबत बनविणे |
बाल बाजार | ||
९ | फेब्रुवारी | मनाचे श्लोक पाठांतर |
पालक सभा | ||
१० | मार्च | पाटीपूजन (गुढीपाडवा) |
खाऊ तयार करणे ( पौष्टिक भेळ) |
शाळेचा पत्ता:
पूर्व प्राथमिक शाळा, ओगलेवाडी
सर्वे नं. १७, हजारमाची पोस्ट – ओगलेवाडी, कराड – ४१५१०५
Email Id :- [email protected]