“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड


श्री. गोकुळ गोटू अहिरे
प्राचार्य टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड
व्हिजन
"तेजस्विनावधितमस्तु"
मिशन
"यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती, संस्कार, व संस्कृतियुक्त शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता, कौशल्ये आणि प्रेरणा विकसित होण्यासाठी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ओजस्वी करणे."
* कला ,वाणिज्य,व विज्ञान शाखांच्या शिक्षणासाठी कराडमधील नामांकित महाविद्यालय.
* विविध विषयात एच. एस. सी. बोर्डात अव्वल क्रमांक पटकावणार्या विद्यार्थिंनींची अखंड परंपरा.
* महाविद्यालयाची स्वतंत्र, प्रशस्त, इमारत व क्रीडांगण, सी. सी. टी. व्ही., सुरक्षारक्षक आणि दक्ष कर्मचार्यांमुळे अत्यंत सुरक्षित वातावरण.
* राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, मौलाना आझाद गुणवत्ता शिष्यवृत्ती व भारत सरकार मागासवर्गिय शिष्यवृत्ती उपलब्ध.
* एस. टी. महामंडळ सवलत पास काढण्याची महाविद्यालयातच सोय.
* विद्यार्थिनी ग्राहक भांडाराच्या माध्यमातून सवलतीमध्ये शैक्षणिक वस्तूंची विक्री.
* स्कॉलर बॅच व बॉर्डर बॅच तसेच तज्ज्ञ अद्यापकांचे विषयावर विशेष मार्गदर्शन.
* विविध विषय दिन, रांगोळी, मेहंदी, फूड फेस्टिवल, हस्तलिखिते, भित्तीपत्रके, वाचन, निबंधस्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजन .
* ग्रंथालय व अभ्यासिकेची उपलब्धता, अत्याधुनिक साधनांनी जाणीवपूर्वक तयार केलेली प्रयोगशाळा.
* विद्यार्थिनींमध्ये कला व क्रीडानैपुण्य, नेतृत्वक्षमता, व्यक्तिमत्त्व विकसित करण्यात प्राधान्य.
* तज्ज्ञ, उच्चशिक्षित व अनुभवी अध्यापक.
* आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणार्या नामांकित माजी विद्यार्थिनी.
* गरीब व गरजू विद्यार्थिनींना गणवेश, वहया व मोफत पास, तसेच एन. जी. भोसले ट्रस्ट तर्फे आर्थिक मदत.
* डिजिटल क्लासरूम व सर्व साधनांनी सुसज्ज ऑडीटोरियम.
लोकमान्य टिळकांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याच्या उद्देशाने कराड मधील दूरदृष्टी व्यक्तींनी एकत्र येऊन
लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच ‘शिक्षण मंडळ, कराड ‘या संस्थेची स्थापना केली . सन १९८६ मध्ये कला व
वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालाची सुरवात करण्यात आली. स्त्री-शिक्षण, ग्रामीण भागातील मुलींना मॅंट्रिकेत्तर
शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने व काळाची पाऊले ओळखून या महाविद्यालयाची उभारणी झाली.
कै. ग. स. तथा दादासाहेब अळतेकर यांच्या शुभहस्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा उदघाटन समारंभ संपन्न
झाला. १२ जुलै १९८६ पासून महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखांचे वर्ग सुरू करण्यात आले. शासनाने
‘पाहिल्याच वर्षी महाविद्यालयास मान्यता व अनुदान प्रदान केले.
सुरुवातीच्या काळात महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र शिक्षण घेत होते. कला शाखा ६२
व वाणिज्य शाखा ३८ विद्यार्थी एवढ्या अल्प संख्येबर सुरू झालेल्या आमच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ
महाविद्यालयात आज एक हुजारहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सन १९९४ पासून या
महाविद्यालयात विज्ञान शाखाही सुरू करण्यात आली आहे.
इ. १२वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत व विषय गुणवत्ता यादीत येण्याची विद्यार्थिनींची परंपरा
गुणवत्ता यादी बंद होईपर्यंत अविरत चालू होती. उच्चतम निकालाची परंपराही अखंडपणे सुरू आहे. क्रीडा
क्षेत्रातील उज्जवल यश ही महाविद्यालयाची ओळख म्हणता येईल. व्यावहारिक, जीवनोपयोगी व अध्यावत ज्ञान
देण्याचे कार्य महाविद्यालयातील उन्चविद्याविभूषित शिक्षक करत असतात. कर्तव्यदक्ष व प्रेमळ शिक्षकेत्तर
कर्मचारी व महाविद्यालयाचा ठेवा आहे.
विविध स्पर्धा, उपक्रम, दिन यातून विद्यार्थीनेंचा सर्वांगीण विकास सध्या करण्यास महाविद्यालय
‘कटिबद्धा आहे. गरीब व गरजू विद्यार्थिनींना मोफत बस पास शैक्षणिक साहित्य, गणवेश तसेच आर्थिक सहाय्य
महाविद्यालयामार्फत दिले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्राहक भांडारा मार्फत सवलतीत व माफक
दरात शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते.
महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून कै. डॉ. रा. गो. प्रभूणे यांनी आपला ठसा उमटविला. महिला
महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य अ. रे. डिसूझा यांच्या कल्पक नेतृत्वातून महाविद्यालयाची जडणघडण
झाली. त्यानंतर झालेल्या सर्वच प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारोह मोठ्या दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन
राज्य निवडणूक आयुक्त मा. नीला सत्यनारायण (आय.ए.एस.) या समारोहास प्रमुख अतिथि व मा. व्ही. बी.
‘पायमल (शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर) हे अध्यक्ष म्हणून लाभले. आज महाविद्यालयाचे
प्राचार्य श्री. जी. जी. अहीरे व उपप्राचार्य श्री. अ. श. आटकर महाविद्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
* वेळापत्रक विभाग
* परीक्षा विभाग
* प्रार्थना विभाग
* क्रीडा विभाग
* दिन विशेष विभाग
* निबंध, वक्तृत्व विभाग
* शिस्त विभाग
* प्राध्यापक प्रबोधिनी, विद्यार्थिनी प्रबोधिनी विभाग
* भित्तिपत्रक कात्रण विभाग
* स्वच्छता विभाग
* क्रीडा, लेझिम, झांज, योगसने विभाग
* रांगोळी, मेहंदी, हस्तकला विभाग
* वैद्यकीय तपासणी (आरोग्य तपासणी ) विभाग
* विद्यार्थिनी ग्राहक भांडार विभाग
* संस्कृतिक विभाग
* प्रसिद्धी विभाग
* आपत्कालीन व्यवस्थापन विभाग
* शिष्यवृत्ती विभाग
* स्कॉलर बॅच विभाग
* सहल विभाग
* हजेरीपत्रक विभाग
* शालेय प्रसंग नोंद विभाग
* कार्यालयीन विभाग
* गरीब व गरजू विद्यार्थिनी सहाय्य विभाग
* नियतकालिक माहितीपत्रक
* जनसंपर्क विभाग
* बसपास समिती
* विद्यार्थिनी माहिती ई. बी. सी.मागासवर्गीय शिष्यवृत्ती विभाग
* अहवाल लेखन
* ओळखपत्र विभाग
* विद्यार्थिनी पालक संघ विभाग
* रजा नोंद विभाग
* इ. १२ वी नवीन प्रवेश इ. ११ वी विद्यार्थिनी विषयावर तुकडी निश्चिती करणे
इयत्ता व तुकडी | विद्यार्थी संख्या | इयत्ता व तुकडी | विद्यार्थी संख्या |
११ अ | ६५ | १२ अ | ६६ |
११ ब | ५३ | १२ ब | ६२ |
११ क | ३५ | १२ क | ६३ |
११ ड | ४२ | १२ ड | ५९ |
एकूण ११ वी कला | १९५ | एकूण १२ वी कला | २५० |
११ विज्ञान | ८१ | १२ विज्ञान | ९८ |
एकूण ११ वी विज्ञान | ८१ | एकूण १२ वी विज्ञान | ९८ |
११ वाणिज्य | ९८ | १२ वाणिज्य | ७७ |
एकूण ११ वी वाणिज्य | ९८ | एकूण १२ वी वाणिज्य | ७७ |
इ. ११ वी एकूण | ३७४ | इ. १२ वी एकूण | ४२५ |
एकूण पटसंख्या | ७९९ |
शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ लिस्ट
महाविद्यालयाची उज्ज्वल निकलची परंपरा विद्यार्थिनींनी विविध स्पर्धामध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
१) रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धेत कु. पवार शालवी (कला) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
२) भारत निवडणूक आयोग प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी कु. रोहिणी चव्हाण (कला) व कु. शालवी पवार (कला) यांची निवड करण्यात आली.
३) श्री. मुधाई विद्यालय, देऊर, ता. कोरेगाव येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कु. राजश्री गुरव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिने अभिजीत दादा स्मृती करंडक वकृत्व स्पर्धा, पुणे येथे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला व टिळक माजी विद्यार्थी संस्कृतिक सेवा संघाचा आदर्श विद्या पुरस्कार प्राप्त केला.
४) कु. स्वरदा मंगेश विदार (११ वी विज्ञान) या विद्यार्थिनीची इंडियन इंस्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे इन्स्पायर कॅम्पसाठी ४५०० विद्यार्थ्यांमधून निवड झाली.
विद्यार्थिनींचे नॅशनललेवल, स्टेट लेवल व डिस्ट्रीक्ट लेवल मधील सुयश –
१. कु. वाघ सृष्टी दयानंद – जलतरण राज्यस्तर तृतीय क्रमांक
२. कु. वाघ सृष्टी दयानंद – Free Style 50 M राज्यस्तर तृतीय क्रमांक
३. कु. वाघ सृष्टी दयानंद – Free Style 100M राज्यस्तर तृतीय क्रमांक
४. कु. पाटील पल्लवी चंद्रकांत कुरश – राज्यस्तरावर उपविजेता प्रथम क्रमांक
५. कु. इनामदार मुस्कान अमजद – ट्रॅडिशनल कुस्ती (मास) राज्यस्तर कास्यपदक तृतीय क्रमांक
मार्च/फेब्रुवारी २०१३
शाखा | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल |
कला | मार्च / फेब्रुवारी २०१३ | २६६ | २१९ | ८३.४६% |
वाणिज्य | मार्च / फेब्रुवारी २०१३ | ६८ | ६६ | ९८.५३% |
विज्ञान | मार्च / फेब्रुवारी २०१३ | ९१ | ८७ | ९८.९०% |
मार्च/फेब्रुवारी २०१४
शाखा | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल |
कला | मार्च / फेब्रुवारी २०१४ | २७६ | २५३ | ९१.६७% |
वाणिज्य | मार्च / फेब्रुवारी २०१४ | ८६ | ८५ | ९८.८४% |
विज्ञान | मार्च / फेब्रुवारी २०१४ | ८८ | ८५ | ९६.५९% |
मार्च/फेब्रुवारी २०१५
शाखा | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल |
कला | मार्च / फेब्रुवारी २०१५ | २५९ | २२८ | ८८.०३% |
वाणिज्य | मार्च / फेब्रुवारी २०१५ | ६४ | ६३ | ९८.४४% |
विज्ञान | मार्च / फेब्रुवारी २०१५ | ९२ | ९२ | १००.००% |
मार्च/फेब्रुवारी २०१६
शाखा | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल |
कला | मार्च / फेब्रुवारी २०१६ | २६७ | २३० | ८६.१४% |
वाणिज्य | मार्च / फेब्रुवारी २०१६ | ७२ | ७१ | ९८.६१% |
विज्ञान | मार्च / फेब्रुवारी २०१६ | ८४ | ८४ | १००.००% |
मार्च/फेब्रुवारी २०१७
शाखा | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल |
कला | मार्च / फेब्रुवारी २०१७ | २७६ | २४४ | ८८.४०% |
वाणिज्य | मार्च / फेब्रुवारी २०१७ | ७८ | ७८ | १००% |
विज्ञान | मार्च / फेब्रुवारी २०१७ | ९४ | ९४ | १००% |
* दिनविशेष
* विद्यार्थिनी कल्याण योजना (दानकलश योजना)
* निबंध लेखन
* वकृत्व स्पर्धा
* भित्तीपत्रक व हस्तलिखित
* शिक्षक प्रबोधिनी
* आदर्श वर्ग / विद्यार्थिनी निवड
* वृत्तपत्र प्रदर्शन व कात्रण संकलन
* परिसर शाळा संपर्क (पालक संपर्क)
प्रा. राजेश अनिल धुळूगडे यांनी भूगोल विषयात एम. फील. ‘रोल ऑफ विकली मार्केट सेंटर इन रूरल डेव्हलपमेंट ऑफ कराड तहसिल इन सातारा डिस्ट्रिक’ प्रथम वर्गामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पदवी संपादन केली.
अ.नं. | विद्यार्थिनींची नावे | हुद्दा |
१ | हेमलता बाळकृष्ण पाटील (जाधव) | दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी |
२ | शिरीन इब्राहीम शिकलगार | मंत्रलयीन साहाय्यक (अर्थ व सांख्यिक विभाग ) |
३ | अश्विनी रामचंद्र कुसुरकर | पोलिस उपनिरीक्षक |
४ | अर्चना चंद्रकांत बरंडे (पाटील) | सरकारी वकील कराड न्यायालय |
५ | रूपाली प्रशांत यादव | माजी पंचायत समिती सदस्य |
६ | सोनाली पाटील | अॅंथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू |
७ | सूचित्रा कशिद | समुपदेशक व प्राध्यापक (ज्युनियर कॉलेज मुंबई) |
८ | शितल साने | प्राध्यापक , एस. पी. कॉलेज, पुणे |
९ | अस्मिता अशोक जाधव | कथ्थक नृत्यांगणा |
१० | वैशाली सुकरे | जलतरण राष्ट्रीय खेळाडू |
११ | पूजा पवार | वेटलीफ्टिंग |
१२ | वैशाली कटरे | अॅंथलेटिक्स राज्य खेळाडू महिला पोलीस, दहिवडी |
१३ | पूनम सोनवणे | आर्मी ऑफिसर |
१४ | प्राणिता मोरे | सिकई राज्यस्तरीय सहभाग |
१५ | नर्गिस ईनामदार | वेटलीफ्टिंग |
शाळेचा पत्ता:
टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड
फायनल प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड
ता. कराड, जि. सातारा.
Email- [email protected]