“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

टिळक हायस्कूल, कराड


श्री. गोकुळ गोटू अहिरे
मुख्याध्यापक टिळक हायस्कूल, कराड
व्हिजन
"तेजस्विनावधितमस्तु"
मिशन
"यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती, संस्कार, व संस्कृतियुक्त शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता, कौशल्ये आणि प्रेरणा विकसित होण्यासाठी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ओजस्वी करणे."
* शाळेची स्वतंत्र इमारत.
* एलसीडी प्रोजेक्टर व संगणकाच्या माध्यमातून शिक्षण.
* सुसज्ज ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका.
* विविध कार्यक्रमासाठी उच्चतम क्षमतेचे प्रेक्षागृह.
* विज्ञान आणि गणिताची सुसज्ज प्रयोगशाळा.
* विपुल क्रीडा साहित्य, पारंगत, अनुभवी क्रीडा शिक्षक.
* गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील शाळा.
* एन.एम.एम.एस., एम.टी.एस.शासकीय रेखाकला याच बरोबर अनेक स्पर्धा परीक्षामंध्ये घवघवीत यश सातत्याने मिळविणारी शाळा.
* विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींतर्फे विद्यार्थ्याना मार्गदर्शन.
* कराडमधील सामाजिक उपक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थी व अध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग.
* कुशल व्यवस्थापन.
* केंद्रशासन पुरस्कृत ‘अटल टिंकरींग लॅब‘ साठी अनुदान प्राप्त झालेली सातारा जिल्ह्यातील
पहिली शाळा.
* शाळासिद्धी – शासनाकडून शाळेचे ‘शाळा सिद्धी’ बाह्यमुल्यांकन करण्यात आले त्यामध्ये शाळेस ए+ ग्रेड प्राप्त झाली.
दि.१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. स्वातंत्र्य युद्धातल एक पर्व संपलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व भारतभर शोकसभांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते. कराडमध्ये तर लोकमान्य टिळकांना देव मानणारे अनेक देशभक्त होते. त्यामुळे कराडवासियांनी दि.०२ ऑगस्ट १९२० रोजी आयोजित केलेल्या शोकसभेस सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र जमले. सभेमध्ये लोकमान्य टिळकांचे अल्पसे स्मारक म्ह्णून कराड येथे पूर्ण हायस्कूल व्हावे अशा आशयाचा ठराव सर्वानुमते संमत झाला. या सभेमध्ये टिळक स्मारक फंडासाठी ९-१ ० हजारांचे देणगीचे आकडे जाहीर झाले.
दि.९ ऑगस्ट १९२० रोजी सभा ही या संस्थेच्या उज्वल आयुष्याची नांदीच ठरली. या पार्श्वभूमीवर कराड नगरीत टिळकप्रेमी नागरिकांच्या सहकार्यातून शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलची स्थापना झाली. कराड नगरीला ‘विद्यानगरी’ म्हणून नावलौकिक प्रात करून देण्यामध्ये ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये ‘शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेच्या “टिळक हायस्कूल, कराड’ या शाळेचे बहुमोल योगदान आहे. उच्च गुणवत्ता आणि देशप्रेमाचे बाळकडू पाजण्याचे अविरत कार्य करणाऱ्या या शाळेने राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सर्व क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटलेला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेस पात्र ठरलेले टिळक हायस्कूल आता शताब्दीकडे वाटचाल करत आहे. स्थापनेपासून कराडमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी या शाळेकडे ओढा असतो. सध्या या शाळेमध्ये इ.५वी ते १० वी अखेर सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वा नावलौकिक वाढविण्यामध्ये शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा
मोलाचा सहभाग आहे.
शालेय विभाग
* शालेय प्रार्थना व विभाग.
* शालेय परिसर स्वच्छता विभाग .
* शालेय अनुशासन.
* क्रीडा विभाग.
* बाह्य परीक्षा विभाग.
* फलक लेखन.
* विज्ञान विभाग.
* सहल विभाग
* सांकृतिक विभाग.
* प्रसिध्दी विभाग.
* तपस्या नियतकालिक विभाग.
* हरवले सापडले विभाग.
* शालेय प्रसंग नोंद विभाग.
* शालेय आरोग्य व आपतकालीन व्यवस्था समिती.
अ.क्र. | इयत्ता / तुकडी | एकूण पट | एकूण पट संख्या |
१ | ५ अ | ३१ | १०२ |
२ | ५ ब | ४० | |
३ | ५ क | ३१ | |
५ | ६ अ | ४० | ८१ |
६ | ६ ब | ४१ | |
९ | ७ अ | ५३ | ९९ |
१० | ७ ब | ४६ | |
१३ | ८ अ | ४१ | १५६ |
१४ | ८ ब | ४४ | |
१५ | ८ क | ३६ | |
१६ | ८ ड | ३५ | |
१८ | ९ अ | २४ | १५२ |
१९ | ९ ब | ३९ | |
२० | ९ क | ४७ | |
२१ | ९ ड | ४२ | |
२३ | १० अ | ३३ | १६६ |
२४ | १० ब | ५३ | |
२५ | १० क | ३२ | |
२६ | १० ड | ४८ | |
एकूण | ७५६ |
शिक्षक स्टाफ लिस्ट
कार्यालयीन कर्मचारी स्टाफ लिस्ट
सेवक वर्ग
* राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नोव्हेंबर २०१७ मध्ये पहिला स्तर राज्यस्तर परीक्षा घेण्यात आली.
यामध्ये कु. थोरात मंथन अभय इ.१० वी.एन.टी.एस.राष्ट्रीय स्तर पहिला स्तर उत्तीर्ण २ साठी निवड.
खालील ३ विद्यार्थी स्तर १ उत्तीर्ण झाले.
१] कु. पुष्कर सतीश अळतेकर
२] कु. अथर्व विजय बोधे
३] कु. मेहुल महेंद्र शहा
* पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश –
फेब्रुवारी २०१७ मध्ये इ.८ वीतील ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. १९ विद्यार्थी पात्र ठरले व
खालील ४ विद्यार्थांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
१] कु.घोलप सर्वेश सर्जेराव – इ .८ वी अ २५४/३०० जिल्हयात ११ वा.
२] कु.देशमाने प्रथमेश महादेव – इ .८ वी अ २१२/३०० जिल्हयात १३१ वा.
३] कु.ढापरे वेदांत विवेक – इ .८ वी अ २१०/३०० जिल्हयात १४२ वा.
४] कु.पाटील ओम भीमगौडा – इ .८ वी अ २१०/३०० जिल्हयात १३९ वा.
* विद्यार्थ्यांचे नॅशनल लेवल, स्टेट लेवल व डिस्ट्रीक्ट लेवल मधील सुयश –
* कु.भोसले शोर्यमन महिंद्र इ.९ वी अ स्काऊटमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.
* कु.भोसले अथर्व तानाजी इ.९ वी अ स्काऊटमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.
* कु.पाटील शिवेंद्र प्रमोद इ.९ वी अ राष्ट्रीय स्तरावर N.I.C कॅम्प कॅडेट साठी निवड.
* कु.सातपुते ओंकार गजानन इ.९ वी.ब राष्ट्रीय स्तरावरील T.S.C.- 1 कॅम्प व ट्रूप सिनियर म्हणून निवड.
* कु.लोहार वेदांत भास्कर इ.१० वी ब याने १० मी एअर पिस्टल रायफल शुटींग मध्ये राज्यात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर सहभाग.
* कु.चोरगे प्रतिक अर्जुन इ.१० वी ब हा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विभागात २ क्रमांक व राज्यात सहभाग.
* कु.साळुंखे आर्यन उमेश इ.८ वी अ याने इंटरमिजीएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त.
* कु.पाटील शिरीष सुरेश इ.९ वी ब बेस्ट कॅडेट म्हणून निवड.
अ.नं. | वर्ष | प्रविष्ठ | उत्तीर्ण | निकाल | ९० % पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी. |
१ | मार्च २०१३ | २६२ | २२५ | ८५.८८% | २१ विद्यार्थी |
२ | मार्च २०१४ | २४२ | २०६ | ८६.०६% | २७ विद्यार्थी |
३ | मार्च २०१५ | २४६ | २३१ | ९३.९०% | २७ विद्यार्थी |
४ | मार्च २०१६ | २५२ | २३४ | ९२.८५% | १८ विद्यार्थी |
५ | मार्च २०१७ | २४० | २२८ | ९५% | २४ विद्यार्थी |
* दिनविशेष.
* विद्यार्थी कल्याण योजना (दानकलश योजना)
* निबंध लेखन.
* वकृत्व स्पर्धा.
* भित्तीपत्रक व हस्तलिखित.
* शिक्षक प्रबोधिनी.
* आदर्श वर्ग / विद्यार्थी निवड.
* वृत्तपत्र प्रदर्शन व कात्रण संकलन.
* परिसर शाळा संपर्क (पालक संपर्क)
* श्री. सचिन सुर्यकांत कुलकर्णी यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत शैक्षणिक वर्ष २०१७.१८ मध्ये एम.ए. इतिहास या विषयात पदव्युत्तर संपादन प्राप्त करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.
* श्री. तानाजी शामराव बुरुंगले यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत शैक्षणिक वर्ष २०१७.१८ मध्ये एम.ए. इंग्रजी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.
* श्री. विजय बापूसाहेब बोधे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक मार्फत शैक्षणिक वर्ष २०१७.१८ मध्ये एम.एस्सी. विषय संप्रेषण या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.
* सौ. संगीता सतीश काणे यांनी विविध नाट्य गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कार्य केले.
* श्री.जालिंदर शंकर पवार यांनी पी.डी. पाटील एक महान व्यक्तिमत्व व यशवंतराव चव्हाण एक ज्ञानयोगी या विषयावर व्याख्याने दिली तसेच इतर शाळामध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना इतिहास ना.शास्त्र या विषयाचे मार्गदर्शन केले
अ.नं. | विद्यार्थी नावे | हुद्दा |
१ | कै.यशवंतराव बळवंत चव्हाण | स्वतंत्र महाराष्ट्राचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे उपपंतप्रधान |
२ | कै.खाशाबा दादासाहेब जाधव | १९५२ हेलसिंकी ऑलम्पीकमध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये भारतास पहिले कास्यपदक मिळवून देणारे कुस्तीवीर |
३ | श्री.मधुसुदन रामचंद्र कोल्हटकर | १९५३ साली एस.एस.सी. परीक्षेत मुंबई राज्यात सर्व प्रथम, तसेच सेक्रेटरी, फायनान्स विभाग, भारत सरकार |
४ | कै.बाळकृष्ण महादेव गोगटे | नामवंत उद्योगपती, बेळगाव. |
५ | श्री.पृथ्वीराज आनंदराव चव्हाण [बाबा] | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयीन मंत्री. |
६ | कै.विठ्ठलराव स.पागे | गांधीवादी राजकारणी १९३१ साली विलिंग्टन कॉलेजवर भगवा फडकविला |
७ | कै.पांडुरंग दादासो पाटील | कराड नगरपालिकेचे अध्यक्ष, सतत ४० वर्षे नगराध्यक्ष व माजी आमदार |
८ | श्री.विलासराव बाळकृष्ण पाटील [उंडाळकर] | अभ्यासू आमदार, विधी व न्याय मंत्रीपद भुषविले |
९ | श्री.शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील | कराड उत्तरचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र साखर महासंघाचे माजी अध्यक्ष |
१० | श्री.दयानंदजी जगन्नाथ म्हस्के | माजी मंत्री झोपडपट्टी व पुनर्वसन. |
शाळेच्या जुन्या आठवणी




शाळेचा पत्ता:
टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड
फायनल प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड
ता. कराड, जि. सातारा.
Email- [email protected]