“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”

पूर्व प्राथमिक शाळा, कराड


सौ. अमृता अवधूत कुलकर्णी
मुख्याध्यापिका पूर्व प्राथमिक शाळा, कराड
व्हिजन
“सुंदर घडतो मातीचा गोळा, लावितसे लळा माझी शाळा”
मिशन
“सुरक्षीत संस्कारक्षम व प्रेमळ वातावरणात बालकांचे शारीरिक , बौद्धिक व मानसिक संगोपन करणारी शाळा”
* सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारी मराठी माध्यमाची शाळा.
* सुसज्ज वर्ग, मोठे मैदान, स्वतंत्र खेळणीघर.
* रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांनी सजलेले प्रशस्त मैदान.
* चित्रमय बोलक्या भिंती.
* अनुभवी व प्रेमळ शिक्षिका.
* सी.सी.टी..व्ही. व डिजिटल शिक्षणाची सोय.
* अग्निशमन यंत्रणा, फर्स्टएड बॉक्स.
* बालकांच्या जडण घडणीसाठी विविध उपक्रम.
* सण, उत्सव, सहल, स्नेहसंमेलन, क्षेत्रभेट यातून बालकांच्या कला गुणांना वाव.
* प्राथमिक शिक्षणाचा उत्तम पाया रचणारा अभ्यासक्रम.
* मराठी माध्यमातून बालकाचा सर्वांगीण विकास व परिपक्व वाढ.
* खेळातून शिक्षण
* अनुभवातून ज्ञान
* संगीताची जाण
* अक्षराचे वळण
* संस्कारांची घडण
* आकर्षक गणवेश.
कराड शहरातील नामांकित संस्थेच्या अनेक शाखातील एक महत्वाची नावारूपास आलेली शाळा म्हणजे “शिक्षण मंडळाची, पूर्व प्राथमिक शाळा, कराड.”
या शाळेच्या स्थापनेसाठी अनेक ममान्यवर व्यक्तींनी मार्गदर्शन केले व शाळा १ जुलै १९७३ मध्ये सुरु झाली. कै. मा. घाटे, कै. मा. प्रभुणे, कै. मा. दादासाहेब देशपांडे, कै. मा. एस.पी.कुलकर्णी, कै. शिवराम उमराणी, कै. तात्या रेठरेकर अशा लोकांच्या सहकार्याने शाळा सुरु झाली.
सुरुवातीला शाळेची मुहूर्तमेढ कन्या शाळेतील (स्व.शे.रा.कि.लाहोटी) वर्गामध्ये झाली. त्यासाठी कै. सौ. सुधा शांताराम पुरोहित यांची नियुक्ती झाली. यांना मदतीसाठी सौ. शीला केशव उमराणी व सौ. कुसुम रघुनाथ कुलकर्णी यांनी मदत केली.
विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत गेली त्यामुळे १९८० साली सौ.श्यामला देशपांडे व सौ. वैशाली क्षीरसागर या दोन शिक्षिकांचा समावेश शाळेत झाला. सर्व शिक्षिकांच्या सेवाभावी वृत्तीमुळे शाळेची बघता बघता विद्यार्थी संख्या २००च्या आसपास पोहोचली. शाळेतील विविध उपक्रम संस्थेच्या सहकार्याने व पालकांच्या मदतीने होत असत. एका वर्गाचे दोन वर्ग दोनाचे चार अशाप्रकारे लावलेल्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले. शाळेमध्ये १९८३ साली संगीत विशारद सौ. उज्वला जोगळेकर रुजू झाल्या.
शाळेचा विस्तार होत होता त्यामुळे जागेची अडचण लक्षात घेता शाळेची शाखा नं. १ व शाखा नं २ अशी विभागणी केली गेली. शाखा नं १ कन्याशाळेतच भरत असे. शाखा नं २ सोमवार पेठेत जुनी नूतन मराठी शाळा होती. त्या ठिकाणी भरू लागली. तिथे तीन शिक्षिका, एक दाई व कन्याशाळेत चार शिक्षिका व एक दाई अशा एकूण नऊ जणींची शाळा झाली. शाखा नं १ ला सौ. श्यामला अ. देशपांडे व शाखा नं २ ला सौ वैशाली व्यं. क्षीरसागर मुख्याध्यापिका म्हणून सेवेत होत्या. शाखा जरी २ असल्या तरी शाळेचे कामकाज सुसूत्रपणे चालत असे. वेळोवेळी लागणारे सल्ले व मार्गदर्शन करण्यासाठी कै. प्रभुणे सर व कै. एस. पी. कुलकर्णी हे नेहमी मदत करत असत.
शाळेचा रंजन कार्यक्रम शिक्षक वर्ग आनंदी, उत्साही व उत्तमपणे पार पडत असत. सहल हा ही उपक्रम मुलांसाठी राबवला जात होता. अशाप्रकारे अनेक उपक्रम शाळेत राबवले जात असत. त्यानंतर शाळेचे स्थलांतर नूतन मराठी शाळा, मंगळवार पेठ, कराड येथे झाले. एकूण ७ वर्ग होते. प्रत्येक वर्गाची विद्यार्थी संख्या सरासरी ७० अशी होती. पुढे ती वाढतच गेली. या शाळेतून गेलेले छोटे विद्यार्थी सध्या खूप मोठ्या पदावर काम करत आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये शाळेतील सर्व सहशिक्षिकांचा मोलाचा वाटा आहे.
सन २०१० मध्ये मा. सौ.शामला देशपांडे निवृत्त झाल्या त्यांचा पदभार सौ.उज्वला जोगळेकर यांनी स्वीकारला. त्यांच्या कल्पनेतून मुलांसाठी सुसज्ज खेळणीघर बनले.
“इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी”
जसजसा शाळेचा विस्तार व संख्यावाढ झाली तशी शिक्षिकांच्या मनात मुलांसाठी नवीन उपक्रम सुचू लागले. संतांच्या गोष्टी सांगून वातावरण व वृत्ती भक्तिमय होण्यासाठी दिंडीचा उपक्रम सुरु करण्यात आला. रेड डे, व्हाईट डे, ग्रीन डे, तसेच बडबडगीत स्पर्धा, वेशभूषा सादरीकरण, पाठांतर स्पर्धा, मैदानी स्पर्धा होऊ लागल्या. त्यामध्ये विदयार्थी आनंदाने सहभागी होऊ लागले. सध्याच्या काळात मुलांच्या ग्रहणशक्ती मध्ये खूप वाढ झाली असून बुद्ध्यांक वाढल्याचे दिसून येते त्यामुळे शिक्षिका पण सतत प्रयत्नशील असतात. दर दोन महिन्यांनी पालक सभा घेतली जाते. मुलांचे चित्रवाचन, अक्षर ओळख, सुव्वाच्य अक्षर याकडे लक्ष दिले जाते. जनरल नॉलेज मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले जातात. शिक्षिकांच्या निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जातात.
शाळेचे सर्व पदाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य यामुळे शाळा मराठी माध्यमाची असली तरी उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे.
अं.नं. | महिना | दिनांक | उपक्रम तपशील |
१ | जून २०१९ | १७-०६-१९ | नवागतांचे स्वागत |
२१-०६-१९ | जागतिक योगदिन | ||
२६-०६-१९ | पालकसभा – नर्सरी व लहान गट | ||
२७-०६-१९ | पालकसभा – मोठा गट | ||
२ | जुलै २०१९ | ०१-०७-१९ | वृक्षदिंडी |
१०-०७-१९ | वारकरी दिंडी | ||
१६-०७-१९ | बैलपोळा | ||
३१-०७-१९ | दीप पूजन | ||
३ | ऑगस्ट २०१९ | ०१-०८-१९ | संस्था स्थापना दिवस |
०२-०८-१९ | नागपंचमी | ||
१४-०८-१९ | रक्षाबंधन | ||
१५-०८-१९ | स्वातंत्र्यदिन | ||
१६-०८-१९ | मुलांना जंताची गोळी देणे. | ||
१६-०८-१९ | लो.टिळक वक्तृत्व स्पर्धा | ||
२०-०८-१९ | बक्षीस समारंभ | ||
२२-०८-१९ | क्षेत्रभेट- लहान गट -संत सखू मंदिर | ||
२३-०८-१९ | दहीहंडी | ||
२९-०८-१९ | पालकसभा -लहान गट नर्सरी | ||
३०-०८-१९ | पालकसभा – मोठा गट | ||
२७-०८-१९ | क्षेत्रभेट – पाण्याची टाकी, मंदिर | ||
४ | सप्टेंबर २०१९ | ०३-०९-१९ | गणेश उत्सव |
०५-०९-१९ | शिक्षकदिन | ||
०९-०९-१९ | क्षेत्रभेट – लहान गट शाळेचा परिसर | ||
१९-०९-१९ | क्षेत्रभेट – मोठा गट जानाई मंदिर | ||
५ | ऑक्टोबर २०१९ | ०१-१०-१९ | पालकांसाठी रांगोळी प्रदर्शन |
०४-१०-१९ | पाटीपूजन, भोंडला | ||
१४-१०-१९ | तोंडी परीक्षा | ||
२२-१०-१९ | लेखी परीक्षा | ||
६ | नोव्हेंबर २०१९ | १४-११-१९ | बडबडगीत स्पर्धा |
२४-११-१९ | सहल – मोठा गट | ||
७ | डिसेंबर २०१९ | ०८-१२-१९ | सहल -लहान गट |
१६-१२-२०१९ ते २०-१२-१९ | क्रीडा स्पर्धा | ||
| पालकसभा- लहान गट | ||
| पालक सभा – मोठा गट | ||
८ | जानेवारी २०२० |
| बक्षीस समारंभ, स्नेहसंमेलन |
२८-०१-१९ | क्षेत्रभेट – लहान गट ( पंढरीचा मारुती ) | ||
३०-०१-१९ | क्षेत्रभेट – मोठा गट ( गरुड डेअरी ) | ||
| बाल बाजार | ||
९ | फेब्रुवारी २०२० |
| भीमरूपी पाठांतर स्पर्धा |
| विज्ञानाच्या गमती जमती | ||
२६-०२-१९ | पालकसभा – लहान गट | ||
२७-०२-१९ | पालकसभा – मोठा गट | ||
१० | मार्च २०२० |
| तोंडी परीक्षा |
११ | एप्रिल २०२० |
| पाटीपूजन |
| लेखी परीक्षा |